दिल्लीतील सुरक्षेत वाढ   

नवी दिल्ली : पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसह निमलष्करी दल तैनात केले आहे. तेथे कोणालाही कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करु दिला जाणार नाही, असेही म्हणाले. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरचा सर्वांत मोठा प्राणघातक हल्ला मंगळवारी पहलगाममध्ये पर्यटकांवर झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली अहे. यासोबतच, मेट्रो स्टेशन, रेल्वे आणि बसस्थान, मॉल्स आणि बाजारपेठेतील सुरक्षेतही वाढ केली आहे.
 
सुरक्षा दलांना संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश आणि हरयानाच्या सीमेवरही विशेष लक्ष असणार आहे.अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स सध्या भारत दौर्‍यावर आहेत. त्यामुळे दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या शहरातील सुरक्षेत आधीच वाढ करण्यात आली होती. दिल्लीतील चांदनी चौक, सदर बाजार, लाजपत नगर, सरोजिनी नगरमध्येदेखील सुरक्षेत वाढ केली आहे.
 

Related Articles